
प्रतिनिधी / बेळगाव
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने पर्यटकांना कोणतेही स्मारक पाहण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असणारी कमल बस्ती व स्वामी विवेकानंद आश्रमात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कमल बस्ती आणि स्वामी विवेकानंद आश्रम पाहण्यासाठी सातत्याने लोक येत असतात. गतवषी लॉकडाऊनमध्ये सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. सध्या देशभरात कोरोनाने कहर मांडला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्मारक, प्राचिन वास्तू-इमारती पाहण्यासाठी पुरातत्त्व खात्याने बंदी घातली आहे.
कमल बस्ती ही जैन धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर वास्तुकलेचा तो उत्कृष्ठ नमुना आहे. मात्र, सध्या पर्यटकांची गर्दी ही धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान कमल बस्ती बंद ठेवण्यात आली आहे. तशी सूचना प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद आश्रमातसुद्धा प्रवेशबंदी करण्यात आली आहे.









