ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना एका नर्सने जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या नर्सला अटक केली आहे.
निवियान पेटिट फेल्प्स (वय 39) असे धमकी देणाऱ्या नर्सचे नाव आहे.
यूएस इंटेलिजन्स सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, फेल्प्सने 13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान उपराष्ट्राध्यक्षांना जीवे मारण्याची आणि शारीरिक इजा करण्याची धमकी दिली होती. ती जॅक्सन हेल्थ सिस्टीमशी संबंधित आहे. तिने अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेतील व्हिडिओ तुरुंगात असलेल्या पतीला पाठवला होता. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला फ्लोरिडामधून अटक करण्यात आली आहे.
तिने हॅरिस यांना उद्देशून आणखी एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात म्हटले होते की, ‘मी बंदुकीने ठार मारणार आहे. आजचा दिवस तुमचा आहे, तू मरणार आहेस. आजपासून 50 दिवस. हा दिवस मनात ठेवा.’









