वार्ताहर / कबनूर
कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीतून माघारीच्या अखेरच्या दिवशी 37 जणांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. आता एकूण 69 उमेदवार रिंगणात उतरून आपले भवितव्य आजमावित आहेत. इचलकंजी शहरालगत सर्वात मोठे निमशहरी असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होत आहे. एकूण सहा प्रभागातून 17 जण निवडून येणार आहेत. यासाठी 30 डिसेंबर अखेर एकूण 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
यामध्ये एक अर्ज अवैध ठरले 4 जानेवारी माघारी चा अंतिम दिवस होता. या अंतिम दिवशी दाखल अर्जातील 37 जणांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यातील दुबार दाखल झालेले सहा अर्ज वजा होता उर्वरित 69 जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत अशी माहिती मंडळ अधिकारी जेआर गोन्साल्विस तलाठी एसडी पाटील व ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार यांनी दिली.
प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन जागेसाठी14जण, प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीन जागेसाठी 12, जण प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन जागेसाठी 7जण,प्रभाग क्रमांक चारमध्ये तीन जागेसाठी 12 जण प्रभाग क्रमांक पाचमध्ये तीन जागेसाठी 17जण व प्रभाग क्रमांक सहामध्ये तीन जागेसाठी 7 जण असे 69 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये विद्यमान 7 सदस्य पुन्हा एकदा भवितव्य अजमावत आहेत तसेच दोन माजी सरपंच, तीन माजी उपसरपंच व दोन माजी सदस्य यांचाही यामध्ये समावेश आहे.
सहा उमेदवारांनी प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल केल्याने बारा अर्ज झाले. त्यातील प्रत्येक एक अर्ज असे6 अर्ज ग्राह्य धरले आहेत. अर्ज माघारी दिवशी प्रत्येक उमेदवारांना चिन्हाचा वापर करण्यात आले आहे. एकंदरीत गावची निवडणूक ही तुळशीचे होणार हे माघारीनंतर चित्र दिसून येत आहे









