वार्ताहर / कबनूर
ग्रामपंचायत कामगारांचा एक पगार त्यांच्या खात्यावर जमा केला असून उर्वरित दोन पगार नोव्हेंबर अखेर देण्यात येणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली.
कबनुर तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत कडील कामगारांनी चकित तीन महिन्याच्या पगारासह अन्य मागण्यांबाबत मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. आजच आंदोलनाचा चौथा दिवस होता. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आप्पा पाटील यांनी दिली. गुरुवारी काही कारणास्तव बैठक न झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद कार्यालयातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली या बैठकीमध्ये श्रमिक कामगार संघटनेचे कॉम्रेड आप्पा पाटील यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. चर्चेअंती ग्रामपंचायत कामगारांचा तीन महिन्याचा थकीत पगार पैकी एक पगार गुरुवारी जमा केला आहे.
उर्वरित दोन पगार 5 नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यात येईल पंधरा महिन्याचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम 14 डिसेंबर रोजी संबंधित कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल व चालू पगारातील कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करण्यात येईल कामगारांची सेवा पुस्तके प्रजेचा किरकोळ दोन दिवसाचा पूर्ण करण्यात येईल तसेच कामगारांची देणी दिल्यास इतर कोणतीही खर्च केला जाणार नाही. याची हमी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः घेतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निर्णयांती आप्पा पाटील यांनी कामगारांच्या मागण्याबाबत सुरू ठेवलेला काम बंद आंदोलन आज मागे घेण्यात येत असल्याचे घोषित केले. त्या बैठकीस ग्रामपंचायत प्रशासक संतोष पवार विनायक इंगवले आप्पा पाटील सुकुमार कांबळे औदुंबर साठे दिलीप शिंदे रियाज पठाण विवेक निंबाळकर अशोक कांबळे लाला मुल्ला गणेश थोरात मलिक सनदी यांच्यासह सर्व कामगार उपस्थित होते.
Previous Articleपाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय सोमवारी मायदेशी परतणार
Next Article अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट; 6 ठार









