प्रतिनिधी / कबनूर
कबनूर येथील ओढ्यामध्ये रविवारी मृत मासे आढळून आले आहे. याबाबत स्वाभीमानी युवा आघाडीचे संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या तक्रारीनुसार मंडळाचे अधिकारी स.ज.हारबर यांनी रविवारी कबनूर येथील ओढ्याची पाहणी करुन पाण्याचे नमुने घेऊन पृथःकरणासाठी पाठविले. तसेच थोड्या प्रमाणात छोट्या आकाराचे मासे मृत अवस्थेत आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे. यापूर्वीही या ओढ्यामध्ये अनेक मासे व सर्प मृतावस्थेत पाण्यामध्ये तरंगत असल्याचे इचलकरंजी कबनूर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले होते त्यावेळीही कोल्हापूरचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती.
पाहणी दरम्यान तक्रारदार यांनी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातकणंगलेच्या स्मशानभूमी नजिकच्या ओढ्यात एका कारखान्याने चार ट्रक सांडपाणी सोडल्याचा आरोप केला. कोल्हापूर रोड वरील ओढ्यामध्ये हायस्कूलच्या मागे सांगतो मी मोठा खंड आहे त्यामध्ये सर्वांनी केलेल्या कामामुळे तिथे चांगल्या प्रतीचे मासे तयार झाले होते पण काही दुर्दैवी लोकांच्या हलगर्जीपणामुळे मध्ये केमिकल पाणी आल्यामुळे मासे मृत्यू झाले आहेत ज्यांनी कोणी केमिकल पाणी सोडले त्यांची चौकशी व्हावी व जलचर प्राण्यांचा जीव वाचवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









