कलाकारांच्या कारकीर्दीत अशी एक भूमिका नक्कीच असते ज्या भूमिकेमुळे त्यांच्या करिअरला टर्निंग पॉइंट मिळतो. अभिनेता रणवीर सिंगला अशाच एका भूमिकेमुळे पाच नव्या सिनेमांच्या ऑफर्स आल्याने रणवीरला नवं वर्ष दणक्यात जाणार आहे. मैदानावर अभिनयाचा सिक्सर मारत भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या करणाऱया 83 या सिनेमाने रणवीरच्या हातात सध्या 5 बायोपिक साकारण्याच्या ऑफर्स आल्या आहेत. बायोपिकमध्ये केवळ त्या व्यक्तीरेखेचा लूक हुबेहुब करून चालत नसते तर त्याच्या लकबी, देहबोली यावरही पकड मिळवावी लागते. कपिल देव यांची भूमिका साकारताना रणवीरने इथेच सिक्सरवर सिक्सर मारल्याने पुरुष व्यक्तीरेखांच्या हिंदीतील बायोपिकसाठी आता रणवीर ट्रेंडसेंटर झाला तर आश्चर्य वाटायला नको.

83 या सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. रणवीरच्या तगडय़ा अभिनयाने 83 सिनेमाने चार चाँद लावले आहे. रणवीरने 83 सिनेमात भारतीय क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका उत्तमरित्या साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सिनेमातील रणवीर सिंहचा लुक,अभिनय आणि त्याचे खेळाप्रती असलेले प्रेम रणवीरने सिनेमातून दाखवून दिले. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटींनीही रणवीरचे कौतुक केले.सध्या रणवीर हा बॉलिवूडचा टॉप अभिनेता म्हणून चर्चेत आहे. 83मधल्या तगडय़ा भूमिकेनंतर रणवीरला अनेक बायोपिक सिनेमांची ऑफर येत आहे.
रणवीर सिंहला 83 सिनेमानंतर 5 बायोपिक सिनेमांची ऑफर आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तीन सिनेमे हे क्रिकेटवर आधारित आहेत. एका मुलाखतीत रणवीरने ही माहिती दिली आहे. रणवीर येत्या काळात एका पॅराप्लेजिक स्विमरच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा स्विमिंगवर आधारित असणार आहे. या सिनेमाविषयी प्रतिक्रिया देताना रणवीरने म्हटले होते की, मला वाटते सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार आहे. पाच बायोपिक डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. यातील एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि लवकरच सिनेमाची घोषणा केली जाणार आहे.









