प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात सोमवारी आकर्षक व वैविध्यपूर्ण आरास करण्यात आली. बेळगावची ओळख असणाऱया कुंद्यापासून करण्यात आलेली सुंदर अशी आरास पाहण्यासाठी सोमवारी दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. कपिलेश्वर मंदिरात सण-उत्सव यानिमित्त आकर्षक आरास केली जाते. सोमवारी 51 किलो कुंदा वापरून आरास करण्यात आली आहे. याचसोबत काजू, बर्फीचाही वापर करण्यात आला आहे. मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे व गणेश देवर यांनी ही सुबक आरास केली. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, दौलत जाधव यांचे यासाठी सहकार्य लाभले.









