नवी दिल्ली/प्रतिनिधी
कम्युनिस्ट नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं होत. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल मागील काही काळापासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना पक्षात सामील करण्यासाठी प्रयत्नशील होते. कन्हैया कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशावर अनेक अफवा उठल्या होत्या. अखेर या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. कन्हैया कुमार २८ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्याने पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या त्यांना पूर्णविराम लागला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) चा सदस्य असलेला कन्हैया कुमारने २०१९ ची लोकसभा निवडणूक बेगूसराय मतदारसंघातून लढवली आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. कन्हैया कुमार निवडणुकीत गिरीराज सिंह यांच्याकडून पराभूत झाला आणि आता पुढील बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे. इंडिया टुडेने याविषयीचे सविस्तर वृत्त दिलं आहे.