ऑनलाईन टीम / कन्नौज :
उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये भीषण अपघात झाला आहे. लखनऊ – आग्रा एक्सप्रेस हायवेवर झालेल्या या अपघातात एकच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये ठेवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब लखनऊमधून मेहंदीपुर बालाजी येथे दर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारने लखनऊ – आग्रा एक्सप्रेस हायवेवर तालग्राम भागात उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. यामध्ये कार मधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या अपघातात मृत झालेल्या सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. मृतांची ओळख पटली असून ज्ञानेद्र यादव (32), सोनू यादव (31), प्रमोद यादव (35), सतेंद्र यादव (18), सूरज (15) आणि मोहित (36) अशी त्यांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.









