ऑनलाईन टीम / जळगाव :
औरंगाबाद आणि जळगाव जिह्याला जोडणाऱया कन्नड घाटात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. त्यातच घाटात सात ते आठ ठिकाणी मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सध्या घाटात दरड हटविण्याचे आणि डागडूजी करण्याचे काम सुरू असून, हा घाट पुढील 8 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या पाटणादेवी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटणादेवी परिसरातील पाच गावे पूराच्या पाण्याने वेढली गेली आहेत. अनेक घरे, गाडय़ांचे मोठे नुकसान झाले असून, पुरात 500 हून अधिक गुरे वाहून गेली आहेत.









