हैदराबाद
स्मार्टफोनच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱया कनेक्ट कंपनीला येणाऱया काळात आपली नवीन उत्पादने भारतात दाखल करायची आहेत. यासाठी कंपनीने नियोजन केले असून विविध ऍक्सेसरीज भारतीयांना येणाऱया काळात उपलब्ध होणार आहेत. कंपनीने पोर्टेबल ब्ल्यूटूथ स्पीकर्स, नेक बँड्स, पॉवर बँक अशी विविध नवी उत्पादने दाखल केली आहेत तसेच आणखीही उत्पादने येणार आहेत. आजच्या युवावर्गाला ही नवी उत्पादने निश्चितच पसंत पडतील असा विश्वास कंपनीला आहे.









