वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोलकत्तामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर रविवारी हॉकी इंडियाच्या दुसऱ्या कनिष्ट पुरूष आणि महिलांच्या पूर्व विभागीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत या दोन्ही विभागात प्रत्येकी 6 संघांचा समावेश राहिल.
दोन गटातील सर्वाधिक गुण घेणारे पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. 21 जुलैला अंतिम सामना खेळविला जाईल. या स्पर्धेतील सामने राऊंड रॉबिन पध्दतीने खेळविले जातील. झारखंड, ओदिशा, बिहार, बंगाल, आसाम, मणिपूर यांचा समावेश आहे. पुरूषांच्या विभागात झारखंड आणि मणिपूर यांच्यात सलामीचा सामना होईल.









