नोकरीत कायम करण्याची मागणी, 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार
प्रतिनिधी/ पणजी
गेली कित्येक वर्षे कदंब महामंडळात चालक व वाहक म्हणून कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱया कामगारांचा धर्णे मोर्चा सुरच असून 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पुढल कारवाई ठरणार असल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे. आयटकच्या झेंडय़ाखाली हा मोर्चा सुरु असून कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करा ही मागणी आहे.
काल मंगळवारी कंत्राटी कामगारांनी चलो पणजी पुकारले होते. त्यानुसार मोठय़ा संखेने कंत्राटी कामगार धरणे मोर्चाच्या ठिकाणी जमा झाले होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कामगानेते क्रिस्तोफर, राजू मंगेशकर प्रसन्ना उत्तगी व इरत आयटकचे नेते उपस्थित होते. इतर विविध संघटनेने या मोर्चाला पाठींबा दर्सविला असून गरज पडल्यास उपोषण करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सुचविले आहे. मुख्यमंत्री काय सांगतात त्याच्यावर पुढील कारवाई अवलंबून असल्याचे कामगारांनी सांगितले.
कदंब महामंडळात सुमारे 450 वाहक व चालक गेली दहा ते बारा वर्षापासून कंत्राटी पध्दतीवर काम करीत आहेत. दर दोन किंवा तीन महिन्यांनी या कामगारंना ब्रेक दिला जातो. एकूणच कंत्राटी कामगारांची नोकरी शास्वत नसल्याचे दिसून येत आहे. महामंडळातील अनेक कामगार निवृत्त झाले असल्याने वाहक व चालक यांच्या 450 जागा रिकाम्या झाल्या आहेत त्याच जागेवर कंत्राटी कामगारांना घेणे सहज शक्य आहे मात्र महामंडळ तसे का करीत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. इलेक्ट्रीक वाहने चालविण्यासाठी नव्या कामगारांची भरती केली जात आहे. त्यांना भरमसाठ वेतन देण्याची आश्वसने दिली जात आहे मात्र गेल्या गेल्या कित्येक वर्षापासून कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱया कामगारांना नाममात्र पगार दिला जात आहे.
कंत्राटी कामगारांवर कायम टांगती तलवार का ?
दर दिवशी 500 रुपये प्रमाणे कंत्राटी कामगारांना पगार देण्याचे ठरले असले तरी दर महिन्याला प्रत्येक्षात दहा ते 12 हजार रुपये दिले जातात. प्रत्येक वेळी दोन ते तिन महिन्यानी कंत्राटी कामगारांना ब्रेक देतात व नंतर काही दिवसांनी त्यांना पुन्हा नोकरीत घेतात त्यामुळे त्यानी बजावलेल्या सेवेची नोंद होत नाही व त्यांना पगाराव्यतीरिक्त इतर कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. एक ठरावीक महिन्यानंततर ब्रेक देऊन पुन्हा नोकरीत घेतले की अगोदर बजावलेल्या सेवेची नोंद उरत नाही पुन्हा नव्याने नोकरीचा काळ सुरु होतो. दहा ते बारा वर्षे सेवा बजावूनही कंत्राटी कामगारांची नोकरी आजही शास्वत नाही, त्यांना केव्हाही नोकरीतून कमी केले जाऊ शकते आमच्या डोक्यावर कायम टांगती तलवार का असा प्रश्न कंत्राटी कामगारानी केला आहे. कित्येक वर्षे काम करूनही नोकरीत कायम केले जात नाही हा आमच्यावर अन्याय नाही काय सरकार आमच्यावर हा अन्याय का करीत आहे असे अनेक प्रश्न कंत्राटी कामगारांनी उपस्थित केले आहे.
आमचे भविष्य सुरक्षित करा
नोकरीत काम करा या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी कंदब बसस्थानकावर धरणे धरले आहेत. कित्येक दिवसांपासून धरणे सुरु आहेत मात्र त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. सरकार आमचा अंत पाहत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही सरकारकडे कोणतेही पॅकेज मागत नाही. आमचा हक्क आम्हाला देण्याची मागणी करीत आहोत. आज महामंडळात जागा रिकाम्या आहेत त्या जागांवर आम्हाला घ्या आणि आमचे भविष्य सुर्नाक्षित करा अशी साधी आणि सोपी मागणी आमची असताना महामंडळ आडेवेडे का घेत आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महामंडळातील अनेक कामगार निवृत्त झाले असल्याने सुमारे 450 जागा आजच्या घडीला रिकाम्या झाल्या आहेत. या जागांवर आज आम्हाल घेणार नसाल तर आम्हा नोकरीत कायम कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्याने नोकरभरती करून एकदा या जागा भरल्या तर आमचे काय आम्ही केवळ कायम खरडेखाशीच करायची अशी संताप्त प्रश्न प्रतिक्रीया कंत्राटी कामगारांनी व्यक्त केली आहे.









