तरुण भारत ऑनलाईन टीम
बऱ्याच चर्चेनंतर अखेर विकी कौशल आणि कतरिना कैफ ने लग्नगाठ बांधली आहे. विकीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअरकेल्यांनतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कतरिना आणि विकी आता तिचे शेजारी होणार असल्याचेही सांगितले आहे.
अनुष्काने सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. तुम्हाला दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही दोघे आयुष्य भर एकत्र रहा, तुमच्यात कायम प्रेम राहो. याचा ही आनंद आहे की अखेर तुमचे लग्न झाले आणि तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश कराल आणि आता आम्हाला कंस्ट्रक्शनचा आवाज ऐकायला मिळणार नाही.”असं या पोस्टमध्ये लिहून विकी आणि कतरिना हे त्यांच्या शेजारी राहणार असल्याची माहिती दिलीय .विकीने जुहूमध्ये एक आलिशान अपार्टमेंट घेतले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे घरही याच इमारतीत आहे.









