गोकुळ शिरगाव / वार्ताहर
कणेरी मधील दत्त कॉलनी येथील प्रसिद्ध अशा यश बेकर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी बेकरीच्या तिसऱ्या मजल्यावरील ऑफिसवर ऑफिसमधील पत्रा उचकटून आत प्रवेश करून तिजोरी फोडून तिजोरीमध्ये असलेली रोख रक्कम 83 हजार सहाशे रुपये चोरी केली. या घटनेची नोंद बेकरीचे मालक रावसाहेब वंदूरे यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. शिवाय त्यांनी बेकरीत बसवण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही कॅमेराचे फुटेज पोलिसात जमा केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल खोत करीत आहेत.