प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
अवघ्या आठ पट असलेल्या शाळेची संख्या गेल्या एक ते दोन वर्षात शाळेचे चित्र बदल्याने हीच संख्या 30 पटावर नेऊन ठेवण्याचे काम इथल्या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी तसेच ग्रामपंचायत च्या मदतीने हि शाळा पुरस्कार प्राप्त आज झालेली आहे,
या शाळेमध्ये प्रवेश करताच शाळेच्या समोरच्या भिंतीवर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पूर्ण नकाशा या भिंतीवर रेखाटलेला दिसतो, या मुलांना आपण कुठल्या गावात आहोत, कोणत्या तालुक्यात आहोत, कोणत्या जिल्ह्यात आहोत, तर कोणत्या राज्यात व कोणत्या देशात आहोत, हे या भिंतीवर पाहताक्षणीच अवघ्या पहिलीत असलेल्या विद्यार्थ्यांना आपला तालुका आपले गाव व संपूर्ण देशाची माहिती या शाळेपासूनच या बोलक्या चित्रांच्या भिंतीवरून या लहानश्या मुलांना माहिती झाली आहे.
वर्गात गेल्यानंतर भिंतीवरील चित्रे पाहून या झाडांच्या फांदीवर एकक, दशक, शतक अशा वेगळ्या प्रकारांची चित्रे या झाडावर पाहून मुलांना गणिते सुद्धा अगदी सोपी वाटू लागलेली आहेत .तर छतावर संपूर्ण आकाश आकाशातील लुकलुकणारे तारे ,चंद्र ,सूर्य याचेही दर्शन पाहायला मिळत आहे. शिवाय आकाशातू उड्डाणे घेणारी विमाने, हेलिकॉप्टर, चंद्रयान यांची माहिती सुद्धा प्रशिक्षण या मुलांना या चित्ररथातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथले विद्यार्थी चित्रातून व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून अधिकच तल्लख व तरबेज होताना पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यात होणारे ढगांचे वातावरण निसर्गात होणारे ऋतू याचे सुंदर उदाहरण चित्र रेखाटन या शाळेच्या खोल्यांमध्ये केलेले पाहायला मिळत आहे.
आज वाढणारी इंग्लिश मीडियम शाळांची संख्या पाहता बरेच पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये न घालता आज या शाळेकडे पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. शाळेचा पट ही दिवसागणिक याठिकाणी वाढत असल्याचे तिथले शिक्षक सांगत आहेत.
या शाळा सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायत कणेरी सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व ग्रामस्थांनी ही शाळा सुशोभीकरणासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात केली आहे.नुकत्याच झालेल्या डॉक्टर जी. पी .नाईक यांच्या “माझी शाळा समृद्ध शाळा ” सन 19 ,20 अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय 108 जि. प .शाळा मधून विद्यामंदिर सिद्धगिरी मठ या शाळेचा समृद्ध शाळा म्हणून या शाळेचा गौरव करण्यात आला आहे.
या सर्व कामासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता सुतार व शिक्षक रमेश जाधव तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शिवाजी ढेरे, अर्चना स्वामी, सुहास स्वामी ,प्रमोद सावंत या सर्वांचे या शाळेसाठी मोठे योगदान आहे त्यामुळे ग्रामस्थ ही या सर्व टीमचे कौतुक करत आहेत.