वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कणेरी तालुका करवीर येथील पाझर तलाव आज पूर्ण क्षमतेने भरला असून हा तलाव भरल्याने शेतकरी वर्गाबरोबरच औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता मिटली आहे.
कणेरी पाजर तलावावर कणेरी, कणेरीवाडी या गावातील शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तर गोकुळ शिरगाव. कणेरी. कणेरीवाडी या गावातील जनावरांसाठी सुद्धा या तलावाचा मोठ्या प्रमाणात या गावातील लोकांना फायदा होतो. शिवाय ह्या तलावाच्या परिसरांमध्ये औद्योगिक वसाहत असल्याकारणाने या वसाहतीमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहत आहेत. या तलावाचा या परिसरातील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या तलावाचा खूप वापर होत आहे. त्यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागातील गावाबरोबरच शेतकरी वर्ग व कर्मचारीवर्ग तलाव भरल्याने चांगलाच सुखावला आहे.
Previous Articleसांगली : कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ
Next Article ब्राझीलमध्ये 24.32 लाख रुग्ण कोरोनामुक्त









