वार्ताहर / सांबरा
कणबर्गी येथे डोंगरमाथ्यावर वसलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात गुरुवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
बुधवारी गावातून श्री सिद्धेश्वर मूर्तीची गाडा मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक गावात फिरून गुरुवारी सकाळी मंदिरात पोहोचली. त्यानंतर दिवसभर श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री मंदिरात भजन सेवा झाली व मध्यरात्रीनंतर मंदिरात अभिषेक घालण्याचा कार्यक्रम पार पडला.
आज महाप्रसाद
शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10 नंतर महाप्रसाद वाटपाला प्रारंभ होणार असून सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसाद चालणार आहे. यंदा महाशिवरात्री उत्सव साधेपणाने करण्याचे ठरले असले तरी महाशिवरात्री उत्सवाची व महाप्रसादाची श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









