युवराज पाटील / सांबरा
कणबर्गी येथे बालचमुंनी सुमारे चाळीसहून अधिक आकर्षक किल्ले बनविले असल्याने गावात अवघी शिवसृष्टी अवतरल्याचा भास होत आहे. सदर किल्ले पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
येथे दरवर्षी खास दिपावळीला आकर्षक किल्ले बनविले जातात. येथील बालचमुंनी वेगवेगळय़ा किल्ल्यांची माहिती मिळवून किल्ले साकारले आहेत. किल्ले बनविण्याच्या माध्यमातून बालचमूंनी छ. शिवरायांचा इतिहास, साहस व पराक्रम जवळून समजून घेण्याचा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. शिवरायांची शौर्यगाथा सर्वांना प्रेरणादायी ठरली आहे.
सिद्धेश्वरनगर, रामतीर्थ गल्ल्ली, चौथा क्रॉस येथे सर्व्हेश सुतार, सार्थक सुतार, निलेश सुतार आदींनी सिंहगड (कोंढाणा) किल्ला बनविला आहे. बसवेश्वर गल्लीत बालकलाकारांनी आकर्षक अवचित गाड बनविला आहे. साहिल गुगरट्टी, स्वयम गुगरट्टी, साईराज गुगरट्टी, दयानंद नेवगिरे, हरीष कृष्णोजी, सिद्धार्थ गुगरट्टी, कुमार बसान, स्वजीत गुगरट्टी, हरिप्रसाद कृष्णोजी, ऋषिकेश गुगरट्टी यांनी हा किल्ला साकारला आहे. सिद्धेश्वरनगर येथे राहूल सुतार, रोहन सुतार आदींनी पन्हाळगड साकारला आहे. चव्हाट गल्ली सिद्धेश्वर रोड येथे जंजिरा किल्ला केला आहे. आकाश चिकोर्डे, जयशील कालकुंद्री, सिद्धार्थ मिरजकर, रोहन धर्मोजी, ओमकार पुजारी, रोहित गोवेकर, जयदीप जानाई, मयुरेश पाटील आदींनी किल्ला बनविण्यासाठी परिश्रम घेतले. शांतीसागर गल्ली येथे प्रदीप मालाई, प्रीतम मालाई, सिद्धार्थ मालाई आदींनी सज्जनगड साकारला आहे. तर पहिला क्रॉस सिद्धेश्वरनगर येथे शिवसेना युवक मंडळाचा सुमेध नालकर, सुजल मोदेकर आदींनी हातगड किल्ला उभारला आहे. किल्ले पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी वाढू लागली आहे. दरवर्षी बालचमूंना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या मार्गदर्शनाखाली किसन सुंठकर, लखन मालाई, दीपक गुगरट्टी, महेश मुचंडीकर, धाकलू मालाई, परशराम गुगरट्टी, विलास करडी व सिद्धेश्वर पंच कमिटीतर्फे भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाते. व विजेते स्पर्धक व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविले जाते.









