खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा पर्यटनदृष्टय़ा अनेकांच्या पसंतीचा ठरला आहे. त्यामुळे या भागात दर शनिवार व रविवार तसेच सुटीच्या दिवशी युवक-युवतींची हुल्लडबाजी तसेच पर्यटनस्थळांचे पावित्र्य धोक्मयात येत असल्याने पोलिसांनी यावर करडी नजर ठेवली आहे. बेळगाव-चोर्लाöपणजी या राज्यमार्गाला जोडणाऱया पर्यटन स्थळांकडे जाणाऱया रस्त्यांवर नाकेबंदी करून तरुणांची तपासणी करून सोडले जात आहे. शिवाय शनिवारी व रविवारी दोन दिवस या भागातील कोणत्याही पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आली असून पोलिसांनी हाती घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. यामुळे पर्यटनस्थळांचे महत्त्व अबाधित राहत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
जांबोटी-कणकुंबी भागातील चोर्ला घाट, चिगुळे, चिखले, बैलूर भाग तसेच चापोली भागातील पर्यटनस्थळे तसेच सुरल भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी शनिवारी व रविवारी बेळगाव-खानापूर भागातील अनेक युवक-युवतींची मोठी गर्दी असते. कर्णकर्कष आवाज, सुसाट वाहने, शिवाय युवक-युवतींचे अश्लील चाळे यामुळे या भागातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कोरोना महामारीच्या गंभीर काळामध्ये अशा प्रकारांवर बऱयाच अंशी बंधने आली होती. मात्र गेल्या काही दिवसात या प्रकाराला ऊत आला आहे. त्यामुळे खानापूर पोलीस उपनिरीक्षक तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार जांबोटी आऊटपोस्ट पोलिसांनी चोर्ला मार्गावरील विविध ठिकाणी तपासणी नाके स्थापन केले आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशी हुल्लडबाजीला मात्र चांगलाच फटका बसत आहे. सदर नाक्मयांच्या ठिकाणी युवक-युवती अथवा पर्यटनासाठी येणाऱया प्रत्येकाची ओळख परेड करूनच त्यांना सोडले जात आहे. बेळगाव-गोवा भागात जाणाऱया लोकांना या गोष्टी बंधनकारक नसल्या तरी पर्यटन स्थळासाठी येणाऱयांना मात्र याची चांगलीच झळ पोहोचली आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी येणाऱयांना याची चांगलीच चपराक बसली आहे.
सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर बंदी
वास्तविक सुटीचा दिवस म्हणजे आनंद लुटण्यासाठी अनेक कुटुंबे दिवसभर घराबाहेर जातात. यासाठी जांबोटी-कणकुंबी विभागातील चिखले, चिगुळेसह विविध धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. सुटीचा आनंद लुटण्यासाठी अनेक कुटुंबे अशा ठिकाणी येतात. पण या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी युवक- युवतींचे अश्लील चाळे वाढले आहेत. त्यामुळे सधन कुटुंबांना याचा त्रास होत आहे. बेळगाव भागातील अनेक युवक-युवती दुचाकीवरून सुसाट वेगाने या भागात फेरफटका मारत हुल्लडबाजी करतात. अश्लील चाळे करण्याचे प्रकारदेखील वाढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱया सधन पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे. यासाठी पर्यटनस्थळांचे व निसर्गरम्य अशा घाटमाथ्याचे रक्षण करण्यासाठी शनिवारी व रविवारी या भागात पर्यटनासाठी येणाऱयांवर पूर्णत: बंदी घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाती घेतला आहे. पोलिसांनी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल कणकुंबी-जांबोटी भागातील सर्वसामान्य नागरिकांतून मात्र समाधान पसरत आहे.
पर्यटनस्थळांचे पावित्र धोक्यात
जांबोटी विभागातील अनेक नयनरम्य ठिकाणे पर्यटकांना साद घालतात. पण धबधबे व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मद्यपान करून दारूच्या बाटल्या टाकणे, दगडावर मारून फोडणे तसेच प्लास्टिक टाकून पावित्र्य धोक्मयात आणत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना याचा फटका बसत आहे. यासाठी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मद्यपान करणाऱयांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. शिवाय वनखात्याच्या अखत्यारित येणाऱया काही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी निर्बंध लावले आहेत. काही ठिकाणी वनखात्याने चेक पोस्ट उभारले आहेत. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय वन्यप्राणी प्रदेश असलेल्या ठिकाणी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे एकीकडे वन्य प्राण्यांपासून धोका टाळण्यासाठी वनखात्याने घेतलेली खबरदारी तसेच पोलीस आणि रोडरोमिओंवर ठेवलेली करडी नजर यामुळे गेल्या दोन आठवडय़ात शनिवारी व रविवारी होणारी गर्दी रोडावली आहे.
चोर्ला मार्गावर अपघातांच्या प्रमाणातही घट
बेळगाव, चोर्ला, कणकुंबी व गोवा हा गोवेकर तसेच बेळगावकरांना जाण्यासाठी सोयीचा रस्ता ठरला आहे. गोव्याचे अनेक पर्यटक बेळगावला खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे वाहनांची रेलचेलही वाढली आहे. अवजड वाहनांवरही निर्बंध लादले आहेत. सुटीच्या दिवशी गोव्याचे पर्यटक दिवसभर बेळगावच्या दिशेने येऊन सायंकाळच्या वेळी परततात. अशा वेळी शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी बेळगाव भागातील अनेक हुल्लडबाज युवक सुसाट वेगाने मद्यधुंद अवस्थेत या मार्गावर ये-जा करताना अनेक वेळा अपघात घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावाही लागला आहे. यासाठी सुटीच्या दिवशी विशेषकरून पोलीस वनखात्याने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी घेतलेले हे क्रम योग्य असल्याने होणाऱया अपघातांवरही नियंत्रण आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
रस्त्यावर वाहने लावून पार्टीत गर्क
चोर्ला मार्ग वळणदार तसेच अपघातप्रवण आहे. अशातच रस्त्यावरच चार चाकी, दुचाकी वाहने लावून नाल्याशेजारी पार्टीत गर्क असणारे युवक दररोज पाहायला मिळतात. सुरल नाल्यात आंघोळ करणे, ओरडणे, नाच-गाणी करणे अशा प्रकारात बेधुंद असणारे हे युवक रस्त्यावरची वाहने बाजूला करताना अन्य वाहन धारकांबरोबर हुज्जत घालतात. गोवा (पणजी) ते सुरल अशी कदंबा बस तसेच गोवेकर ये-जा करताना त्यांच्याशी हुज्जत घालणे, मद्यपींची रस्त्यावरची वाहने बससाठी त्रासदायक ठरत आहेत.









