प्रतिनिधी/ बेळगाव
कणकुंबी तपास नाक्मयावर शनिवारी अबकारी अधिकाऱयांनी बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त केली. यासंबंधी गदग जिल्हय़ातील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ वाहनातून दारू वाहतूक करताना त्याला अटक करण्यात आली आहे.
मारुती मानाप्पा लमाणी (वय 35, रा. अडवीसोमापूर तांडा, ता. गदग) असे त्याचे नाव आहे. जीए 08 ए 9499 क्रमांकाच्या स्कॉर्पिओतून दारू वाहतूक करण्यात येत होती. तपासणीनंतर मारुतीला अटक करून सुमारे 5 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ व सुमारे 1 लाख रुपये किमतीचा (17 बॉक्स) दारूसाठा जप्त करण्यात आला.
अबकारी विभागाचे सहआयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त बसवराज संदीगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयकुमार हिरेमठ, ए. व्ही. रावळ, प्रवीण रंगसुबे, बी. ए. पांगेरी, बसवराज मुडाशी, एस. जी. शिंदे, संतोष दोडमनी, एम. आर. निलजकर आदींनी ही कारवाई केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.









