मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन काही शाळा केल्या सुरू
काही विद्यालयांमध्ये पालक सभांवरच भर
काही शाळांतील शिक्षकांचे कोविड रिपोर्ट प्रतीक्षेत
प्रतिनिधी / कणकवली:
शाळेचा पहिला दिवस उत्साहाचा असतो परंतु कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारी माध्यमिक शाळा, ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये भरविण्यात आले. परंतु कणकवली तालुक्मयात पहिल्या दिवशी शाळेची घंटा अर्धीच वाजली. काही शाळांनी वर्ग सुरू केले, तर काही शाळांनी पालकांची संमती, शिक्षकांची कोविड तपासणी आधी गोष्टी पूर्ण न झाल्यामुळे वर्ग सुरू केले नाहीत. मात्र, ज्या शाळांनी वर्ग सुरू केले, त्यांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना केली असल्याचे काही शाळांना भेटी दिल्यावर स्पष्ट झाले.
सोमवार, 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या. त्यानंतर तालुक्मयातील नववी-दहावी आणि अकरावीöबारावी असे वर्ग असणाऱया शाळांनी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी आधीपासून शाळांची साफसफाई केली. मात्र, अनेक शाळांमधील पालक सभा होऊ शकल्या नाहीत. अनेक शाळांच्या शिक्षकांच्या कोविड तपासण्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे काही शाळांनी पहिला दिवस शाळेचा पालक सभा घेण्यात घालविला. यासंदर्भात शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक औदुंबर भागवत म्हणाले, आमच्या शिक्षकांची कोविड तपासणी झाली आहे. मात्र, त्यांचा रिपोर्ट आला नाही. त्यामुळे इच्छा असूनही शाळा सोमवारी सुरू करणे शक्मय झाले नाही. परंतु पालक सभा बोलवून पालकांची संमती घेतली.
शहरातील कणकवली कॉलेज आणि विद्यामंदिर हायस्कूल यांचे वर्ग भरविण्यात आले. मात्र, हे वर्ग भरवताना विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेण्यात आल्याचे कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले आणि विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पी. जे. कांबळे यांनी सांगितले. विद्यार्थी शिक्षकांची थर्मल तपासणी, एका बेंचवर एकच विद्यार्थी आधी उपाययोजना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद दिसत होता. परंतु थोडी भीतीही चेहऱयावर होती. अशाही स्थितीत ज्या शाळांनी वर्ग भरविले, त्या शाळांचा पहिला दिवस योग्य ती काळजी घेऊन यशस्वी झाला.
काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीसाठी प्रयत्न करून पहिल्या दिवशीच यशस्वीरित्या वर्ग भरविले. यासंदर्भात नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर तांबे म्हणाले, शाळेमध्ये पहिल्या दिवशी मुलांची 50 टक्के एवढी चांगली उपस्थिती होती. मुलांसाठी आम्ही काही अचारसंहिता लागू केली आणि ती मुलांनी काटेकोरपणे पाळली. त्याचबरोबर पालक सभा आयोजित केली. त्यात काही पालक घाबरलेले दिसत होते, काही पालक मात्र मुलं शाळेत जात असल्याचा आनंद व्यक्त करत होते. पोरं घरी हुंदडत राहतात. त्यापेक्षा शाळेत गेलेली बरी, अशी प्रतिक्रियाही काही पालकांनी व्यक्त केली. कनेडी कनि÷ महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक यांची तपासणी करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.









