वार्ताहर /कडोली :
पावसाळा सुरु होताच नदी नाल्यांचे पाणी शिवारात शिरते. या पाण्याबरोबर मासे देखील शिवारात जातात. त्यामुळे शेतकरी असो किंवा गावकरी असो असे मासे पकडण्यासाठी नेहमीच धडपड करतात. बऱयाचवेळा 10 ते 20 किलो वजनाचे मासे देखील सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
कडोली येथेही नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर रवी होनगेकर यांच्या शेतात मासे (ठिग्गूर) सापडले. याचे वजन जवळपास 10 ते 12 किलो होते. या मास्यांमुळे नुकतेच लावणी केलेले भात मात्र खराब झाले. अशा प्रकारे मोठे मासे मिळत असल्याची माहिती मिळताच गावकऱयांनी शेतात एकच गर्दी केली होती. श्रावण महिन्याच्या सुरु होण्याच्या शेवटच्याविदशीच असे मासे मिळल्याने साऱयांचीच चंगळ झाली. मटणापेक्षा मास्यांवरच ताव मारलेली बरी म्हणून साऱयांनी धडपड करुन हे मासे पकडले.
कडोली शिवारातून मार्कंडेय नदी वाहते. राकसकोप्प जलाशयातून या नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी येते. त्यामुळे या पाण्याबरोबर मासे येत असतात. दरवषीच अशा प्रकारे शिवारात मासे सापडतात. यावषी देखील मासे सापडले. मात्र भले मोठे ठिग्गूर असल्यामुळे पाहण्यासाठी आणि धरण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या घटनेची कडोली परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.









