प्रतिनिधी / कडेगाव
राज्य शासनाच्या मिशन बिगीन निर्णयाअंतर्गत जिल्ह्यातील आठवडी बाजार, पशुबाजार आणि इतर बाबी सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने कडेगाव येथील आठवडा बाजार तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेला शुक्रवारवारचा व सोमवारचा आठवडी बाजार 23 ऑक्टोबर रोजी भरवण्यात येणार आहे. असे कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी बैठकीत स्पष्ट केले .
कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन लागु झाला. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा, आठवडी बाजार, पशुबाजार, बससेवा बंद ठेवण्यात आले होते. ऑनलाईनच्या प्रक्रियेत नियम व अटीला अधिन राहुन एक एक सेवा पूर्ववत करण्यात येत आहेत. शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढत आठवडाबाजारांना मुभा दिली. त्यानुसार कडेगाव येथे छ. शिवाजी महाराज चौकात शुक्रवार व स्व. सुरेशबाबा चौकातील सोमवारचा आठवडी बाजार भरवण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी सांगितले.
कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा निता देसाई म्हणाल्या की शहरातील मुख्य रस्त्यावर कोणीही व्यापारी अथवा शेतकरी यांनी वस्तुची विक्री करू नये याची सर्व विक्रेत्यांनी नोंद घ्यावी शासकिय मापदंडाच्या आधिन राहुन प्रत्येक विक्रेत्यांनी १० फुटांचे अंतर ठेवूनच बसावे त्याचबरोबर बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्या लोकांनी मास्कचा व सॅनिटाइजरचा वापर करावा यात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांनी कोरोना महामारीचे गांभिर्य लक्षात घेऊनच खरेदी काळजीपुर्वक करावी. असे आवाहन केले. मुख्य रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला वस्तुंची विक्री करताना आढळुन आल्यास नगरपंचायतीकडून कडक कारवाई करण्यात येईल असेही नगराध्यक्षा निता देसाई यांनी सांगितले.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यातील सहा सरपंचावर अविश्वास ठराव दाखल
Next Article सोलापूर एमआयएम शहराध्यक्ष बिहारमध्ये करणार प्रचार








