प्रतिनिधी/कडेगाव
कडेगाव व पलुस तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न बाबतीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांची भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पलुस तालुक्यातील शिष्टमंडळाने कराड येथील विमानतळावरील विश्राम गृहावर भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याप्रश्नी बैठक घेवून पलुस व कडेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करू असे आश्वासन दिले.
तसेच पलुस तालुक्यातील पलूस, कुंडल, ताकारी पाचवा मैल पर्यंतचे पुनर्वसनाचे पैसे देण्याचे आदेश गडकरी यांनी दिले. गुहागर विजापूर रस्त्यावरील सुरली घाटातील वनीकरणाच्या हद्दीतील थांबलेले काम वनीकरण यांच्याकडे अडकलेली फाईल पुर्ण होवून रखडले आहे. ते तातडीने संबंधित अधिकारी यांना बोलावून रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करणे तसेच पलुस तालुक्यातील बुलीँ, खोलेवाडी, नागठाने पुलाचा प्रश्न तातडीने सोडवावा असेही आदेश दिले.
यावेळी शिष्टमंडळात राजू मदवाने, नितीन सुर्यवंशी, आप्पासाहेब सुर्यवंशी, महावीर चौगुले, राजेंद्र लाड, भिमराव परळे, अमोल पवार, मोहन जोतिराम पवार उपस्थित होते.
Previous Articleमुंबई : दोन लाखांची लाच घेताना API लाचलुचपतच्या जाळ्यात
Next Article इचलकरंजीत तीन पानी जुगार अड्यावर छापा, २७ जण अटकेत








