सोयाबीनसह अन्य पिकांचेही मोठे नुकसान : शेतकऱ्यांची भरपाईची मागणी
कडेगाव : प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह शनिवारी दुपारी पडलेल्या मुसळधार पावसाने कोतवडे ( ता. कडेगाव ) येथील ऊस भुईसपाट झाला आहे. या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन , भुईमूग , घेवडा , उडीद , मका यासह अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सध्याचे चित्र आहे. तसेच या पावसाने आडसाली ऊसाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसा नंतर उसंती दिलेल्या पावसाने आज पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या मुसळधार पावसामुळे शेकडो एकरावरील ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे . आधीच हुमणी किडीने शेकडो एकरावरोल ऊसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यांमुळे पावसाने ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आर्थिक कचाट्यात सापडला आहे. या मुसळधार पावसाने सध्या ओढे, नदीपात्र अक्षरशःओसंडून वाहू लागले आहेत . कडेगाव तालुक्यातील कडेगाव, शाळगाव , बेलवडे , तोंडोली ,सोहोली , कडेपूर, कडेगाव, चिखली, शिवणी, आंबेगाव, नेवरी, येतगाव, हणमंतवडिये यासह अन्य मुसळधार पाऊस पडला आहे . परंतु पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून लवकरात – लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








