प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचाराची सुविधा झाली आहे. शासनातील महसूल व आरोग्य विभागाने कडेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात आता कोविड सेंटर उभारण्यात आले होते.जिल्हा अधिकारी डॉ.अभिजित चौधरी, प्रांताधिकारी गणेश मरकड व डॉक्टर यांनी आता कडेगाव तालुक्यातील रूग्णांची सोय मिरज येथे कोरोनाचे रुग्ण जादा झालेत. यामुळे कडेगाव येथे दोनच दिवसापूर्वी कोविड रूग्णांची सोय करण्यात आली होती. शुक्रवारी या रुग्णालयात आसद येथील ७५ वर्षीय कोरोना बाधित महिलेला उपचारासाठी दाखल केले आहे. या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
स्थानिक पातळीवर उपचाराची सोय झाल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना दिलासा मिळत आहे. मिरज येथे वाढती रुग्णसंख्या पाहता तेथे बेड उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत आहे. कडेगाव मध्ये सोय करणे अत्यावश्यक होते. यामुळे कडेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर, कडेगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय डाँ.आशिष. ए.कालेकर,डॉ.व्हि.व्हि.पत्की,डॉ.अभिषेक रेणूशे हे कामकाज पाहणार आहेत. तसेच प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसिलदार डॉ.शैलजा पाटील व महसूल विभाग व आरोग्य अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








