स्वाभिमानीची दुसरी बैठक, एकरकमी एफआरपी अधिक दोनशेची अपेक्षा
प्रतिनिधी / कडेगाव
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांच्यात आज कडेगाव येथे ऊसदरप्रश्नी होणाऱ्या दुसऱ्या बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला एकरकमी एफआरपी आणि गळीत हंगाम संपल्यानंतर अधिक २०० असा दर द्यावा अशी मागणी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत केली होती.
यावेळी बहुतांशी कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित नसल्याने निर्णय झाला नाही. यामुळे आज बुधवारी दुपारी कडेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची दुसरी बैठक़ होणार आहे.