प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या संदर्भातील नियमावली आणि आदेशाच्या कठोर अंमलबजावणीला गुरुवारी रात्री आठपासून जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली. आठनंतर शहराचा संपूर्ण ताबा पोलीस यंत्रणेकडे गेला. नागरिकांची तपासणी सुरु करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परिजिह्यातून कोल्हापूर जिह्यात येणार्या नागरिकांना प्रवेशबंदी केल्याचे स्पष्ट केले असून इतर नियमही कठोररीत्या राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनासह, पोलीस, आरोग्य आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या यंत्रणा गतिमान झाल्या आहेत.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन संदर्भातील नवीन नियमावली बुधवारी रात्री जाहीर करुन त्याची अंमलबजावणी गुरुवारी रात्री आठपासून करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिह्यात अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले. त्यामध्ये परजिह्यातून कोल्हापूर जिह्यात प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरुन येणार्या वाहनांना रोखण्यासाठी जिह्यात प्रवेश करणार्या नाक्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्याचबरोबर शहरातही पोलीसांनी हालचाली गतिमान करुन विनाकारण फिरणार्या वाहनचालकांची कसून तपासणी केली. त्याचबरोबर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पोलीस यंत्रणेसह आरोग्य आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या यंत्रणा गतिमान झाल्या.
अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवाशी वाहतुकीला परवानगी
बस गाडÎा वगळता इतर सर्व खाजगी प्रवासी वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हांतर्गत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रवासात अंातरजिल्हा किंवा एका शहरातून दुस्रया शहरात प्रवासी वाहतूक करता येणार नाही. तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादीत राहील. आंतरजिल्हा आणि आंतरशहर वाहतुक ही फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अत्यंविधीसाठी, कुंटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी सुरू राहण्यास परवानगी आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांना 10 हजार दंड केला जाईल.
शासकिय कार्यालयांमध्ये 15 टक्के अधिकारी, कर्मचार्यांनाच परवानगी
सर्व शासकीय कार्यालये ( राज्य, केंद्र, स्थानिक प्राधिकरण) ही फक्त 15 टक्के अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत चालू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. कोरोना उपाययोजनांशी संबंधित आस्थापनांना यातून वगळण्यात आले आहे.
लग्न समारंभाला दोन तासाचीच परवानगी
लग्नसमारंभाला दोन तासांचीच परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फक्त 25 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. या आदेशाचा भंग करणार्या पुटुंबाला 50 हजाराचा दंड करण्यात येईल. तसेच या आदेशाचे पालन न केल्यास लग्न कार्यालयही बंद करण्यात येईल.









