बेंगळूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या नेतृत्त्वाखाली लढविली जाईल, असे आश्चर्यकारक वक्तव्य माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले. संपूर्ण बहुमत मिळवून राज्यात सरकार स्थापण्याचा आपला उद्देश आहे. बसवराज बोम्माई मुख्यमंत्री होऊन सरकारला पुढे घेऊन जात आहेत. तर नलिनकुमार कटील पक्षाचे नेतृत्त्व करीत आहेत. त्यामुळे कटील यांच्या नेतृत्त्वाखालीच आगामी निवडणूक लढविली जाईल, असेही ते म्हणाले.
येडियुराप्पा यांचा पायउतार करून ईश्वरप्पा आणि शेट्टर यांना दूर ठेवून मंत्रिमंडळाची रचना करणार असल्याचे यापूर्वी कटील यांच्या नावाने एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, आता ईश्वरप्पा यांनी कटील यांच्याबाबत अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे, असे सांगितले जात आहे.









