सांगली / प्रतिनिधी
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि साको चेस क्लब, येरेवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये भारतासह कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, ईजराईल, सर्बिया, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, आर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशांतील ग्रँडमास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. कझाकस्तानचा फिडे मास्टर झाल्माखानोव रमझान हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ६४ गुणांसह विजेतेपद पटकावले. तसेच ४६.७५ गुणांसह भारताचा फिडे मास्टर आर्यन वार्षणे हा या स्पर्धेमध्ये वयोगटातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला. अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर साहिदी हा ६१ गुणांसह या स्पर्धेचा उपविजेता ठरला. कझाकस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर माखनेव देनीस यास ५६.५ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. आर्मेनियाचा फिडे मास्टर सर्गीस मनुक्यान यास ५६ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. कझाकस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर झांदोस अगमानो यास ५५ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक . श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच साको चेस क्लब, येरेवन यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून चंद्रशेखर कोरवी, . दीपक वायचळ, . सारंग विवेक पुरोहित आणि . शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








