भारतात लसीकरण सुरू होण्यापूर्वीच कजाकिस्तानने भारतीय लस खरेदीची तयारी चालविली आहे. यासंबंधी माहिती भारतातील कजाकिस्तानचे राजदूत येरलान अलीम्बेव यांनी दिली आहे. अनेक देशांनी आतापर्यंत भारतीय लस खरेदीत स्वारस्य दर्शविले आहे.
कजाकिस्तान तीन लसी विकसित करत आहे, या सर्वांची चाचणी दुसऱया किंवा तिसऱया टप्प्यात आहे. भारतासोबत अधिकृत चर्चा झालेली नाही, परंतु भारतात दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. या लसींच्या पुरवठय़ाकरता भारतासोबत चर्चा करणार असल्याचे अलीम्बेव यांनी म्हटले आहे.









