नवी दिल्ली
देशातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात घटीचा सिलसिला सुरू राहिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ओएनजीसीचे उत्पादन लक्ष्य साध्य न झाल्याने जुलैमध्ये उत्पादनात वर्षाच्या आधारावर 3 टक्के इतकी घट दिसली आहे. जुलैमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन 3.2 टक्के घटून 25 लाख टनवर राहिले आहे. एप्रिल-जुलै कालावधीत उत्पादन 3 टक्के घटत 99 लाख टन इतके राहिले होते.









