वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षातील जुलै महिन्यात भाराताची कच्च्या तेलाची आयात मागील 10 वर्षाच्या निचाकी पातळीवर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार जुलैमध्ये कच्च्या तेलाची आयात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 36.4 टक्क्मयांनी अधिक झाली आहे. अशी स्थिती मार्च 2010 मध्ये निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पेट्रोलियम ऍण्ड नैसर्गिग मंत्रालयाच्या पीपीएसीकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणुचा संसर्गामुळे नवीन प्रतिबंध लागल्याने कच्च्या तेलाची मागणी मोठय़ा प्रमाणात घसरली असल्याचे सांगितले आहे. मागील महिन्यात कच्या तेलाची आयात ही एका वर्षाच्या तुलनेत 36.4 टक्क्मयांनी घसरुन 12.34 दशलक्ष टनावर स्थिरावली आहे. तसेच मागील चार महिन्यापासून घसरणीचे सत्र सुरु असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताचे स्थान
इंधन ऑईलच्या आयातीत वाढीसह भारतात तेल शुद्धीकरण उत्पादनाचे आयात 46.4 टक्क्मयांनी वधारुन 4.07 दशलक्ष टन झाली आहे. तसेच जगाच्या बरोबरीत भारत हा तिसऱया नंबरचा कच्चे तेल आयात करणारा देश असल्याचेही स्पष्ट केले आहे.









