ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना रुग्णाचे पार्थिव चक्क कचऱ्याच्या पॉलिथीन पिशवीत भरल्याची लाजिरवाणी बाब ठाण्यातील एका रुग्णालयातून समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कोरोना रुग्णांचे चार मृतदेह आहेत. हे मृतदेह गाडीत ठेवण्यात आले आहेत. त्यामधील एक स्ट्रेचरवर आहे. त्याला कचऱ्याच्या काळ्या पॉलिथीन पिशवीत गुंडाळण्यात आले आहे. त्याच्या चेहऱ्यावर पांढरी पिशवी आहे.
किरीट सोमय्या यांनी या प्रकारानंतर सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाकडे पार्थिव पॅक करायला पिशव्या नाहीत. म्हणून कचऱ्याच्या काळ्या पिशवीत चिकटपट्टीने पार्थिव पॅक केले जात आहेत. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.









