नाथ पै सर्कल जवळ सेवेत असताना घडली घटना
प्रतिनिधी /बेळगाव
कचरावाहू वाहनांवरील चालकांचा सेवेत असतानाच मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास नाथ पै सर्कल जवळ ही घटना घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मेहबुबसाब खाजेसाब इनामदार (वय 50, रा. पाटील गल्ली, खासबाग) असे त्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा परिवार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सरकारी आदेशानुसार भरपाई मिळावी अशी मागणी मेहबुबसाब यांच्या पत्नीने केली आहे.
पत्नी रिजवाना यांनी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना एक अर्ज दिला आहे. मेहबुबसाब हे कंत्राटदार वाय. बी. गोल्हर यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून काम करत होते. शनिवारी सकाळी कामावर असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू कशामुळे झाला याचाही उलगडा झाला नाही. आपल्याला माहिती न देताच मृतदेह घरी आणण्यात आला आहे. याकडेही रिजवाना यांनी जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले आहे.









