शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघनप्रकरणी एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार परिसरात कंबरेला रिव्हॉल्वर बांधून फिरणाऱया एका हॉटेल चालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे परवानाधारकांना आपली शस्त्रs पोलीस स्थानकात जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत रिव्हॉल्वर घेऊन फिरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
खडेबाजार परिसरात हॉटेल चालविणाऱया एका हॉटेल चालकाने आपल्या कंबरेला रिव्हॉल्वर बांधल्याचे छायाचित्र गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोणीतरी त्याची छबी टिपून ते व्हायरल केले आहे. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच रात्री सरकारतर्फे संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याची रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे.
12 ऑगस्ट 2021 रोजी परवानाधारकांनी शस्त्रs जमा करण्यासंबंधी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार बेळगाव शहर व तालुक्मयातील परवानाधारकांनी आपली शस्त्रs जवळच्या पोलीस स्थानकात जमा केली आहेत. तरीही कंबरेला रिव्हॉल्वर बांधून फिरणारी व्यक्ती कोण? अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी छायाचित्रातील व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
अखेर खडेबाजार परिसरात आर्यन हॉटेलसमोर फिरणाऱया या पिस्तुलधाऱयामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. म्हणून संबंधिताविरुद्ध भा.दं.वि. 188, 268 व शस्त्रास्त्र कायदा कलम 30 अन्वये एफआयआर दाखल करून त्याच्याकडील परवाना असलेले रिव्हॉल्वर जप्त केले आहे. परवाना रद्द करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले.
शस्त्र घेऊन फिरू नका
सध्या पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे परवानाधारकांकडून शस्त्रs जमा करून घेण्यात आली आहेत. परगावांहून बेळगावला येणाऱयांनीही आपल्यासोबत शस्त्रs आणू नयेत. शस्त्र घेऊन शहर व उपनगरांत फिरू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे.









