प्रतिनिधी/ बेळगाव
कंग्राळ गल्ली येथील छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेसमोर विजापूर किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेकडून मागील 16 वर्षांपासून सुबक किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यावषीही यामध्ये खंड पडू न देता युवकांनी एकत्र येत भव्य अशी प्रतिकृती तयार केली आहे.
विजापूर किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन नुकतेच आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते झाले. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शरद पाटील, बाबू कुटे, बाबू इंगोले, किरण सांबरेकर, विशाल पाटील, शाम शंभूचे, सुनील शंभूचे, दिगंबर काकतकर, सागर इंगोले, विकी कंग्राळकर, पंकज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. किल्ला तयार करण्यासाठी अथर्व शंभूचे, अनुज भगनाचे, स्वप्निल निळकंठाचे, निखिल निळकंठाचे, ओमकार चौगुले, स्वयं इंगोले, सुजल सांबरेकर, श्रेयस भगनाचे, सिद्धार्थ काकतकर, यश अडकुरकर, हेमंत शंभूचे, वेदांत कंग्राळकर, ओम होर्डेकर, आदित्य केसरकर, प्राची कंग्राळकर यांनी मेहनत घेतली.









