वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कोरोना महामारी देशातून हद्दपार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कडोलीच्यावतीने सोमवारी कंग्राळी बुद्रुक येथे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
यावेळी 45 वर्षांवरील जवळजवळ 120 जणांना सदर लस देऊन विनामास्क फिरू नका, सॅनिटायझरचा कायम वापर करा, असा सल्लाही उपस्थित नागरिकांना देण्यात आला.
यावेळी कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साहाय्यिका वर्षा घोडके, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका आदींनी लसीकरण मोहिमेत भाग घेतला. लसीकरणप्रसंगी ग्राम पंचायत अध्यक्षा संध्या चौगुले, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, सदस्या भारता पाटील, अर्चना पठाणे, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते मयूर बसरीकट्टी, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.









