वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराज की जय, दुर्गामाता की जयच्या जयघोषात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी बुद्रुक शाखा व ग्रामस्थांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे दसरोत्सव पार पडणाऱया दुगामाता दौडची रविवारी विजयादशमी दिवशी साधेपणाने सांगता करण्यात आली.
कोरोना संसर्ग रोगाच्या महामारीने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने दौड 15 ते 20 शिवप्रेमींच्या समुहामध्ये साजरी करणे, लहान मुलांना दौडमध्ये न घेणे, गर्दी न करणे, आदी अटींवर साजरी करण्याचे नियम लावल्यामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत कंग्राळी बुद्रुक शाखेच्यावतीने दौड साजरी करण्यात आल्याचे आयोजकांसाठी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
दौड लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली, कलमेश्वर गल्ली, चव्हाट गल्ली, बाहेर गल्ली, शास्त्रीनगर, संताजी गल्ली, मसणाई गल्ली, पाटील गल्ली, मराठा कॉलनी, वैभवनगर, शाहूनगर आदी परिसरामध्ये 15 ते 20 कार्यकर्त्यांच्या समुहामध्ये काढण्यात आली. यावेळी प्रत्येक वर्षी दौडचे शाही थाटात होणारे स्वागत कमी समुहामध्ये करण्यात आले.
कोरोना महामारीतसुद्धा शिवरायांचा स्वाभिमान ताजाच
कोरोना महामारीमुळे शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामध्ये दौड साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रेमींच्या हृदयात असणार स्वाभिमान मात्र ताजाच दिसून येत होता.
शनिवारी विजयादशमी दिवशी श्री मरगाई मंदिर आवारात प्रेरणामंत्राने व आरतीने दौडची सांगता करण्यात आली.
दौड यशस्वी करण्यासाठी निरंजन जाधव, सागर भेकणे, प्रवीण चव्हाण, शंकर पाटील, रवि चव्हाण, किरण कोळी, भरत कडोलकर, किरण कोलते, योगेश पवार, आदर्श जाधव, किरण कागणकर, आकाश पाटील, शुभम चौगुले, ओमकार पाटील, आकाश मुतगेकर सह इतर शिवप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.









