प्रतिनिधी / बेळगाव
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमा बांधवांनी आजवर अनेक लढे दिले आहेत. या लढ्याच्या अंतिम टप्प्यावर आपण कर्नाटकी दडपशाहीचा सामना करीत आहोत. अशावेळी सीमाभाग केंद्रशासित व्हावा यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा म. ए .समितीचे नेते किरण ठाकुर यांनी व्यक्त केली .कंग्राळी खुर्द येथे शुक्रवारी सकाळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना किरण ठाकुर यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.कंग्राळी खुर्द येथे झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन प्रसंगी माजी आमदार बी. आय. पाटील यांच्यासह यल्लाप्पा बेळगावकर ,मनोज पावशे सुनील अष्टेकर, नीलिमा पावशे, किरण गावडे, सुरेश अगसगेकर, पिराजी मुचंडीकर,अशोक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.