कंग्राळी बुद्रुक : अलतगे येथील युवा काँग्रेस कमिटीतर्फे कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष यल्लाप्पा लुमाण्णा पाटील व उपाध्यक्षा ज्योती सुधीर पाटील यांचा नुकताच सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त जवान बाळू पाटील होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार बाळू पाटील व गजानन घुग्रेटकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी, कंग्राळी खुर्द व अलतगे येथील रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, अपंग, विधवा पेन्शन व इतर विकासकामे करून दोन्ही गावांचा विकास करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी निंगाप्पा चौगुले, बाबू होनगेकर, कल्लाप्पा चौगुले, शिवाजी पाटील, परशराम पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक गजानन घुग्रेटकर यांनी केले. प्रकाश टक्केकर यांनी आभार मानले.
Previous Articleअतिवाडात ग्रा. पं. सदस्यांतर्फे धरणाशेजारी स्वच्छता मोहीम
Next Article बीबीएमपीची पाच एकर जमीन अतिक्रमणमुक्त









