वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
येथील प्राथमिक शाळेमध्ये कंग्राळी खुर्दमधील सहाजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये एका नुकत्याच निवृत्त होऊन घरी परत जाणाऱयाचाही समावेश आहे.
कंग्राळी खुर्दमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले हे सहाजण दिल्ली, मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी होते. या सर्वांची व्यवस्था ग्राम पंचायतीमार्फत करण्यात येत आहे. दोन दिवसांनी एकदा शासकीय डॉक्टर येऊन त्यांच्या शरीरातील तपमानाची तपासणी करून जात आहेत. तसेच एपीएमसी पोलीस स्थानकाच्या पोलिसांचा खडा पहारा आहे..









