मुंबई \ ऑनलाईन टीम
नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर तिचे ट्विट अकाऊंट हे सस्पेंड करण्यात आलं आहे. अकाऊंट सस्पेंड केल्यावर कंगनाने म्हटले आहे की, माझा आवाज उठवायला अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीएमसी पक्षाने विजय मिळवल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या वक्तव्यांमुळे पश्चिम बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते.










