ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्यानंतर आणि मुंबई पोलिसांवरील तिच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच वक्तव्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, असे वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देतोय, अशी वक्तव्य लोक गांभीर्याने घेत असे सांगत पुढे ते म्हणाले, मुंबई, महाराष्ट्रातील लोकांना पोलीसांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, त्यांचे कर्तृत्व त्यांना माहित आहे. त्यामुळे कुणी पाकिस्तानशी तुलना केली किंवा आणखी कुणाशी केली तरी त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊ नये. याला अधिक प्रसिद्ध देऊन या गोष्टी मोठ्या केल्या आहेत. शहाण्या लोकांनी या गोष्टींबद्दल फार बोलू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कंगणाच्या कार्यालयातील बांधकाम कारवाईबाबत आपल्याला फारशी माहिती नाही असे सांगत शरद पवार म्हणाले की, आता कारवाई करत तिला बोलण्यास संधी दिली आहे. मुंबईत कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. तसेच महापालिकेची काही नियमावली आहे, अधिकार्यांना योग्य वाटलं असेल त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.









