विधानसभेत गदारोळ , कामकाज तीनवेळा तहकुब
मुंबई / प्रतिनिधी
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी तसेच मुंबई पोलिसांबद्दल भय व्यक्त करणारी अभिनेत्री कंगना रानौट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला. विधानपरिषदेत काँग्रेसच्या भाई जगताप यांनी कंगना विरोधात तर विधानसभेत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला.
हा हक्कभंग केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रनौटने केलेली गद्दारी आहे. 2016 मध्ये कंगना अध्ययन सुमनला कोकेन घेण्यास सांगत होती. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असे भाई जगताप म्हणाले.
अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मफत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंर्त्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ’रिपब्लिक टीव्ही‘ ही वफत्तवाहिनी बंद करण्यात यावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंग मांडताना केली.
अर्णव गोस्वामी स्वतरू न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. स्वतरू खटला चालवत आहेत. स्वतरू निकाल देत आहेत, अशा शब्दात संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी गोस्वामींचा समाचार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात असे घटना म्हणते. अर्णव स्वत:ला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणार्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली.
दरम्यान, या प्रस्तावानंतर विधानसभेत भाजपने प्रचंड गदारोळ घातला. गोंधळामुळे सभागफहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.









