ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून वांद्रे कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने न्याय व्यवस्थेवर टीका करणारे ट्विट केले. त्यामुळे कंगना पुन्हा एकदा अडचणीत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाने केलेल्या ट्विटविरोधात आता एका वकिलाने खाजगी तक्रार केली आहे. कंगनाने न्याय व्यवस्थेविरूद्ध द्वेषयुक्त आणि अपमानकारक ट्विट केले होते. तिने पप्पू सेना असा उल्लेख केला होता.
दरम्यान, तक्रार करणाऱ्या वकिलाचे नाव अली कासिफ खान देशमुख असे असून या तक्रारी वर 10 नोव्हेंबर रोजी अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार आहे.









