ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगना रानौत प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सातत्याने धमकीचे फोन येत आहे. अशी माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून हे धमकीचे फोन येत आहे. काल म्हणजेच मंगळवारी देखील त्यांना धमकीचे 7 फोन आले होते.
‘कंगना रानौत से दूर रहो, ये बात समझ लो, तुमने गलत किया है, अभि भी संभल जाओ नही तो…’ अशा धमक्या मिळत आहेत. आज पहाटे देखील दोन धमकीचे फोन येऊन गेले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून अनिल देशमुख यांना फोनवरुन धमकीचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान, कंगना रौनातने मुंबई आणि मुंबई पोलिसांचा अवमान केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
कंगना आपल्या बेजबाबदार विधानातून महाराष्ट्र, मुंबई व मुंबई पोलिसांचा अवमान करत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले. अशा महाराष्ट्राचा जर कोणी अवमान केला तर राज्यातील जनता कधीही सहन करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले होते.









