ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी चार हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सकाळी सलग चौथ्या दिवशी रुगांसंख्येने द्विशतक पार केले. जिल्ह्यात सकाळी 201 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4723 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या 201 रुग्णांमध्ये 125 रुग्ण मनपा हद्दीतील आणि 76 जण ग्रामीण भागातील आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या 4723 रुग्णांपैकी 2373 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 234 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून सध्या 2116 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









