ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात सोमवारी पुन्हा कोरोनाचे 16 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1301 वर पोहोचली आहे.
औरंगाबाद मध्ये पहिला रुग्ण 15 मार्च रोजी सापडला होता. मात्र, मागील महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने फैलावत आहे. हा आकडा 1300 च्या पुढे पोहचला आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच 16 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आत्तापर्यंत 50 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
जिल्हा परिषदे कडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आढळलेल्या 16 रुग्णांमध्ये शहरातील सुभाष चंद्र बोस नगरमध्ये 4, भवानी नगर 2, हुसेन कॉलनीत 1, बायाजीपुरा 1, ईटखेडा 1, अल्तमेश कॉलनीमध्ये 1, जवाहर नगर 1, मयुर नगर 1, शाह बाजार 1, राम नगर 1, रोशन गेट 1 आणि गजानन मंदिर परिसर मध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. यामध्ये 6 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, आता पर्यंत 684 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 567 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









